GDS to PA Marathi Book

Sale!

GDS/MTS/Postman to PA Book मराठी भाषेत

1,049.00

Availability: 19 in stock

Category:

Description

पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट / एलजीओ परिक्षेसाठी मराठी माध्यमातील ही पहिली आवृत्ती हाती देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या पुस्तकाचा विषय सोपा आणि दैनंदिन वापरातील मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय टपाल विभाग दरवर्षी पोस्टल सहाय्यक /सॉर्टिग सहाय्यक / एमटीएस/पोस्टमन/पदासाठी विभागीय पदोन्नती परीक्षा आयोजित करते. ही परीक्षा उत्तीर्ण होणे हे प्रत्येक GDS/MTS/POSTMAN बांधवांचे स्वप्न असते . तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्याच्या दिशेने आमच्या कडून एक छोटासा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हे पुस्तक नवीनतम सर्व सुधारणांसह अद्ययावत करण्यात आले आहे. या पुस्तकात संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर तर केलाच आहे मात्र विशेष म्हणजे यामध्ये 1000+ MCQs मराठी भाषेत देण्यात आलेले आहेत.त्याचबरोबर गणित विषयासाठी शॉर्ट स्ट्रिक्सचा वापर केलेला आहे. हे पुस्तक लिहिताना अत्यंत काळजी घेण्यात आली असली तरी, त्यात काही चुका झाल्या असतील तर प्रकाशक जबाबदार नाही. हे पुस्तक केवळ एक मार्गदर्शक आहे आणि विविध नियमांतर्गत नमूद केलेल्या विविध विभागीय आदेशांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा संबंध असल्यास, संबंधित कार्यालयीन आदेशाचा संदर्भ घ्यावा. महाराष्ट्रातील बऱ्याच MTS/POSTMAN बांधवांना हिंदी किंवा इंग्रजी भाषा पूर्णपणे समजण्यास अडचण होते त्यासाठी हा आमचा मराठी भाषेत पुस्तक काढण्याचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी हे पुस्तक डिजिटल रुपात होते , मागील काही वर्षात हजारो GDS/MTS/POSTMAN बांधवांनी डिजिटल कॉफीच्या माध्यमातून पदोन्नती मिळविली आहे मात्र बऱ्याच बांधवांनी पुस्तकाची हार्ड कॉपी मिळावी यासाठी विनंती केली होती. हे पुस्तक डिजिटल कॉपीपेक्षा अधिक सुधारित, संशोधित आणि अद्ययावत आपल्या हाती देत आहोत. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल. अशाच आमच्या शुभेच्छा….

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “GDS/MTS/Postman to PA Book मराठी भाषेत”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart